इचलकरंजी / प्रतिनिधी
मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्यानिमित्त रविवारी ३० रोजी सायंकाळी ५.३० वाजता श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्य गृहात मराठीतील निवडक लोकप्रिय गीत-संगीताची सुरेल मैफिल चैत्र पाडवा विशेष “ऋतु हिरवा” कार्यक्रम आयोजिला आहे.
अविनाश सूर्यवंशी हे या कार्यक्रमाचे निर्माते असून गायक मुकुंद चौगुले प्रस्तुतकर्ते आहेत. या कार्यक्रमातून मराठीतील लोकप्रिय निवडक गीत-संगीताची मैफिल रंगणार आहे.
