इचलकरंजीत आजपासून ‘माणुसकीची भिंत’

इचलकरंजी : दिवाळी

सणाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब व गरजूंना नवे, जुने वापरायोग्य कपडे व वस्तू मिळावेत, या उद्देशाने व्हिजन इचलकरंजी या सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी माणुसकीची भिंत हा उपक्रम राबवला जातो. ‘नको असेल ते द्या, हवे असेल ते घेऊन जा’ असे ब्रीद घेऊन हा उपक्रम आठ वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी दि. १९ ते दि. २० ऑक्टोबर

रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत येथील व्यंकटराव हायस्कूलसमोर ‘माणुसकीची भिंत’ उभी राहणार आहे. या ठिकाणी नागरिकांनी वापरण्यायोग्य नवे-जुने कपडे माणुसकीच्या भिंतीवर देऊन गरिबांची दिवाळी आनंदी करण्यासाठी मदतीचा हात द्यावा, तसेच ज्यांना कपडे हवे आहेत, त्यांनी घेऊन जावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Scroll to Top