इचलकरंजी / प्रतिनिधी
अखंड हिंदुस्थानचा मानबिंदू रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत इचलकरंजी महानगरपालिकेसह शहर व परिसरात अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील शिवतीर्थ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी उद्यानातील महाराजांच्या अर्ध पुतळ्यास त्याचबरोबर कॉ. के.एल. मलाबादे चौकामधील राज्याभिषेक सोहळा डिजिटल फलकास आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महानगरपालिका कर्मचारी श्रीहर्ष माळगे यांची कन्या आराध्या माळगे हिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित केलेल्या भाषणास उपस्थित मान्यवरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी उपायुक्त नंदू परळकर, उपायुक्त राहुल मर्डेकर, शिवतीर्थ समितीचे अध्यक्ष पुंडलिक जाधव, माजी सभापती राजू बोंद्रे, सहा. आयुक्त विजय राजापुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी विकास खोळपे, सहा. आयुक्त रोशनी गोडे, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत संगेवार, सतिश मुळीक, भारत बोंगाडे, क्रीडा अधिकारी संजय शेटे, शितल पाटील, गणेश शिंदे, सुजाता दाभोळे, सहा. क्रीडा अधिकारी संजय कांबळे, स्वच्छता निरीक्षक विजय पाटील, महेश बुचडे, आनंदा मकोटे आर्दीसह महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.

