इचलकरंजीत ‘ऑपरेशन सिंदूर’चा जल्लोष

इचलकरंजी / प्रतिनिधी

पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पाडले. या कारवाईनंतर संपूर्ण देशभरात आनंदाची लाट पसरली आहे. इचलकरंजी शहरातही भारतीय जनता पक्षाच्या वतीने या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कारवाईने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. या ऐतिहासिक कारवाईच्या समर्थनार्थ इचलकरंजीत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. भारतीय सैनिकांचा जयजयकार करत पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. यावेळी पाकिस्तानचा ध्वज जमिनीवर ठेवून त्याचा धिक्कार करण्यात आला.
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या विजय उत्सवात प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते, अनिल डाळ्या, शेखर शहा, अहमद मुजावर, नरसिंह पारीक, नजमा शेख, राजू बोंद्रे, शशिकांत मोहिते, चंद्रकांत इंगवले, बाळासाहेब माने, म्हाळसाकांत कवडे, पांडुरंग म्हातुकडे, दादा भाटले, रवि जावळे, सतीश मुळीक, मंगल सुर्वे, अश्विनी कुबडगे, नागुबाई लोंढे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top