मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फौंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे राज्यस्तरीय मराठी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
शुक्रवार दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्र, गोवा, बेळगाव विभागातील ३६ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. या स्पर्धेचे परीक्षक या नात्याने प्रसिद्ध रंगकर्मी ज्ञानेश मोघे गोवा, मंगेश दिवाणजी पुणे आणि यशोधन गडकरी सांगली हे जाणकार उपस्थित राहणार आहेत. दि. २७ डिसेंबर रोजी दुपारी १ पासून येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात स्पर्धेस सुरुवात होईल. तर स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी सोमवारी दि. ३० तारखेला अनेक एकांकिका सादर होणार आहेत. स्पर्धेचा बक्षीस समारंभ याचवेळी सर्व सादरीकरण संपल्यानंतर होणार आहे.