कोल्हापूर / प्रतिनिधी
किमान वेतनाच्या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, किमान वेतन द्या, या मागणीसाठी इचलकरंजी महापालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रविवार (दि. १६) पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निवेदन इचलकरंजी नगरपरिषद कामगार युनियनच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी तथा महापालिका प्रशासक अमोल येडगे यांना दिले.
