इचलकरंजीत भ. महावीर जयंती उत्साहात साजरी

इचलकरंजी/ प्रतिनिधी

इचलकरंजीयेथील भगवान महावीर जयंती उत्सव मंडळ, सकल जैन समाज इचलकरंजी च्या वतीने भगवान महावीर २६२४ वा जन्म कल्याणक महोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. यानिमित्त गुरुवारी दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते भगवान महावीर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने गुरुवारी सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली होती.
सकल जैन समाजाच्या वतीने एकत्रितपणे भगवान महावीर जन्म कल्याणिक महोत्सव करण्याची वेगळी परंपरा या शहरांनी जपली आहे. या परंपरेला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जैन धर्मीय प्रश्नमंजुषा स्पर्धा, पाककला स्पर्धा, अष्ट द्रव्य थाळी सजावट स्पर्धा, ट्रेजर हंट ऑन व्हील स्पर्धा आणि रक्तदान शिबिर तर सायंकाळी जैन भजन स्पर्धा फ्लॉवर डेकोरेशन स्पर्धा, प्रवचन, अष्ट द्रव्य थाळी सजावट स्पर्धा असे विविध कार्यक्रम पार पडले. भगवान महावीर जन्म कल्याणिक महोत्सव
निमित्त आज गुरुवारी मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत सकाळी आदिनाथ जैन मंदिर, गावभाग येथून प्रभात फेरी आयोजित केली होती.
ही फेरी गुजरी पेठ, कागवाडे मळा, राजवाडा चौक, शांतिनाथ मंदिर, थोरात चौक, बालाजी चौक, शाहू पुतळा मार्गे जैन बोर्डिंग येथील चंद्रप्रभू जैन मंदिर येथे आल्यानंतर ध्वजारोहण झाले. दिवसभर रक्तदान शिबिर, बहुबली येथील वृद्धाश्रमास शिधावाटप तसेच टीबी क्लिनिक येथील रुग्णांना दूध व बिस्कीट वाटप शिवतीर्थ जवळ असलेल्या आनंदगुरु चपाती भाजी सेवा केंद्र या ठिकाणी मिष्ठान भोजनाचे वाटप झाले. सकाळी सर्व मंदिरामध्ये जन्म कल्याणिक महोत्सव त्याचबरोबर पालखी सोहळा ही पार पडला. सायंकाळी सहा वाजता श्री १००८ भगवान महावीर रथोत्सव सोहळा सुरु झाला. यावेळी देखावा स्पर्धा आयोजित करण्यात आलेला होते. जैन धर्मीय विषयावर व समाज प्रबोधनात्मक देखाव्यावर आयोजित या स्पर्धेत अनेक लक्षवेधी देखावे सादर करण्यात आले होते. धार्मिक तसेच समाज प्रबोधनात्मक जिवंत देखाव्यातून अनेक संदेश देण्यात आले. गावभाग येथील जैन मंदिर मधून सुरू सुरू झालेल्या या मिरवणुकीत मोठ्या सं’येने जैन श्रावक व श्राविका सहभागी झाल्या होत्या. या मिरवणुकीत रथ व वाद्यपथकांचा समावेश होता. अनेक महिला विविध वेशभूषा करून या मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.
या मिरवणुकीमध्ये माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, राहुल खंजीरे, स्वप्निल आवाडे उत्सव मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील सचिव उदय चौगुले यांच्यासह इचलकरंजी येथील जैन मंदिराचे अध्यक्ष गुंडाप्पा रोजे, ओमप्रकाश छाजेड, अजित खंजीरे, राजेंद्र शहा, ग्यानचंद पाटणी, प्रकाशचंद राठोड, प्रमोद भाई मेहता, रमेश जैन, रवींद्र पाटील, शेषराज पाटणी, अशोक बाफना, बाळासाहेब परीसा चौगुले, बाळासो पाटील, अनिल बमन्नावर, कुंतीलाल पाटणी, शशिकला बोरा यांचा सहभाग होता. मिरवणूक नामदेव मैदान या ठिकाणी आल्यानंतर विसर्जित करण्यात आली यावेळी विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ त्याचबरोबर गेली पन्नास वर्षे या महोत्सवाला योगदान देणाऱ्या विविध व्यक्तींचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

Scroll to Top