इचलकरंजी / प्रतिनिधी
जागतिक मुद्रण दिनानिमित्त प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजीच्या वतीने मुद्रण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून आ. राहुल आवाडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी कलगोंडा पाटील होते. मुद्रण कलेचे जनक जोहान्स गुटेनबर्ग यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. असोसिएशनचे अध्यक्ष सीताराम शिंदे यांनी स्वागत केले. उपाध्यक्ष संजय निकम यांनी प्रास्ताविक केले.
स्वप्निल नायकवाडे व सुप्रिया नायकवडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विनोद मद्यापगोळ, नरेंद्र हरवंदे, महादेव साळी, दीपक वस्त्रे, गणेश वरुटे, राकेश रुगे, सुधाकर बडवे, दिनेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.
कलगोंडा पाटील यांनी सर्व मुद्रकांनी आपल्या व्यवसायातील अडीअडचणी एकमेकांबरोबर वाटून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले.
