इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील मुख्य रोडवर कॉ. मलाबादे चौकात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळा उभारणीचा पायाभरणी सोहळा संभाजी भिडे गुरुजी यांच्या हस्ते गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आला. येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ११ फूट उंच पंचधातूचा पुतळा उभारण्यात येणार आहे.
अनेक वर्षांपासून इचलकरंजीत उभारण्यात येणाऱ्या पुतळ्यासाठी जिल्हाधिकारी व आयुक्तांनी आवश्यक सर्व परवानग्यांची पूर्तता करून मंजुरी दिली आहे. यावेळी खा. धैर्यशील माने, आ. राहुल आवाडे, माजी आ. प्रकाश आवाडे, माजी आ. सुरेश हाळवणकर, आयुक्त पल्लवी पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, पै. अमृत भोसले, मिश्रीलाल जाजू, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, अनिल डाळ्या, अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे, उपायुक्त नंदू परळकर आदींसह नागरिक उपस्थित होते. २०१९ मध्ये शिवभक्तांनी रायगडवरील माती कलशामधून आणली होती. पायाभरणी करताना ही माती त्या ठिकाणी अर्पण केली.

