जिल्ह्यातील तीन लाख मुलींना एचपीव्ही लस देणार

जिल्ह्यातील तीन लाख मुलींना गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधात्मक एचपीव्ही लस देण्यात येणार आहे. या लसीकरणाचे तालुकानिहाय नियोजन करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत एचपीव्ही लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला.

ही मोहिम मंत्री मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून विविध कंपन्यांचे सीएसआर, दानशूर व्यक्ती, वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागातील अधिकारी यांच्या सहयोगाने राबविण्यात येत आहे. मुश्रीफ म्हणाले, जिल्ह्यातील तीन लाख मुलींना लस देताना शाळाबाह्य मुलींचाही त्यात समावेश करा. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध करून ठेवा. यामुळे लसीकरणावेळी उपलब्ध नसलेल्या मुलींना सोयीनुसार ती लस घेता येईल. प्रत्येक तालुक्यात पुढील सात दिवस लसीकरणाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करा. डॉ. राधिका जोशी यांचे लसीकरण मार्गदर्शनाचे व्हडिीओ दाखवा. जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, प्रत्येक तालुकानिहाय लसीकरणाचे नियोजन केले जाईल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळांत शिक्षणाधिकारी नियोजन करतील. मुलींना आवश्यक माहिती देण्यासाठी व पालकांची सहमती घेण्यासाठी प्रक्रिया राबिवण्यात येईल. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.सत्यवान मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध पिंपळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांचेसह सर्व तालुक्यातील गट शिक्षण अधिकारी उपस्थित होते.

लसीकरणाबाबत काही शंका असल्यास आरोग्य विभागाकडे संपर्क साधा, असे आवाहन करत मुश्रीफ म्हणाले, अनेक संशोधनानंतर तसेच त्याच्या ट्रायल झाल्यानंतरच जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआरने ही लस टोचण्यासाठी मंजुरी दिली आहे. त्यामुळे एचपीव्ही लस विश्वासाहर्र् असून प्रत्येक पालकाने आपल्या 9 ते 18 वयोगटातील मुलींना ती द्यावी.

Scroll to Top