इचलकरंजी / प्रतिनिधी
मान्सूनच्या आगमनातच इचलकरंजीत तब्बल तीन ते साडेतीन सात मेघगर्जनेसह _ धो धो पाऊस पडल्याने इचलकरंजीकरांची चांगलीच दैना उडाली. मा, या पावसाने हवेत गारवा निर्माण झाल्याने तप्त जीवाला गारवाही लाभला. तर दुसरीकडे या दमदार बरसलेल्या पावसाने मुख्य रस्त्यासह शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. गटारी तुडूंब भरुन रस्त्यावर आल्याने जागोजागी कचरा विखुरला गेला होता.
शहरात यंदा मान्सूनपूर्व पावसाने दडी मारल्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास आठवडाभर संततधार धरली होती. त्यानंतर पाऊस पुन्हा गायब झाला होता. गुरुवारी कर्नाटक बेंदुरचा सण असताना पावसाची हजेरी लागणार हे निश्चित होते. परंतु कोणालाही अपेक्षित नव्हती. अशा पध्दतीने वरुणराजाने जोरदार हजेरी लावत सर्वांची भंबेरी उडवून दिली. सकाळपासून तप्त उन्हाच्या झळा
सोसाव्या लागत असताना दुपारी तीननंतर अचानकपणे मेघ दाटून आले आणि दुपारच्या सुमारास सायंकाळ होऊन गेली. काळेभोर ढग जमल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. हळुहळू बरसण्यास सुरुवात केलेल्या वरुणराजाने जोरदार मेघगर्जनेसह सर्वांना घाबरवून सोडले. कानठळ्या बसविणाऱ्या वीजांचा कडकडाट आणि जोरदारपणे हजेरी लावलेल्या पावसाने संपूर्णजनजीवन काहीच क्षणातच विस्कळीत झाले.
दमदार पावसामुळे गटारी तुडूंन भरुन वाहू लागल्या तसेच सखल भागात पाणी साचून राहिल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली.जवळपास तीन ते साडेतीन तास पावसाची रिमझिम सुरुच होती.

