ज्याच्या घरी नाही पुस्तकाचं कपाट त्याचं घर होईल भुईसपाट – मा. प्रा. अमर कांबळे सर

विद्यार्थ्यांच्या मनात जिद्द व चिकाटी असेल तर गरिबांच्या घरी सुद्धा ज्ञानाचा दिवा लागतो. पुस्तके ही माणूस बनायला शिकवतात. आपल्या महाराष्ट्रात अनेक थोर संत, महापुरुष होऊन गेले आहेत. महाराष्ट्राला संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. अनेक संतांनी ग्रंथांच्या माध्यमातून तर थोर पुरुषांनी कथा ,कादंबऱ्या, चरित्र यांच्या माध्यमातून वाचनाचे महत्त्व सांगितलेले दिसून येते. असे प्रतिपादन प्रमुख वक्ते व मार्गदर्शक प्रा. डॉ. अमर कांबळे यांनी केले ते वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था. कोल्हापूर व जिजाऊ बालविकास मंदिर मजले येथे आयोजित वाचन प्रेरणादिन निमित्त वाचन सप्ताह कार्यक्रमात ते बोलत होते.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. डॉ. अमर कांबळे, व्यासपीठावर निवेदक संतोष वडेर, मुख्याध्यापक दत्तात्रय माने व इत

पुढे ते म्हणाले आपण आपल्या आई-वडिलांचा आदर करायला शिकले पाहिजे. डॉ. अब्दुल कलाम यांचा वाढदिवस आज सर्वत्र साजरा झालेला दिसून येतो. डॉ. अब्दुल कलाम हे अत्यंत कष्टातून शिकलेले आहेत. डॉ.अब्दुल कलाम म्हणतात, ‘मी कोठे जन्माला यावे हे माझ्या हातात नाही, पण जिच्या पोटी जन्माला आलो तिचे नाव मात्र मोठे करणे हे माझ्या हातात आहे. समाजामध्ये आपण एक आपला आदर्श निर्माण केला पाहिजे.

वाचनकट्टा संस्थेचे उपाध्यक्ष श्री. संतोष वडेर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून सांगितले. विद्यार्थ्यांच्या मनात वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून हसत खेळत विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सृजनशक्ती श्रमिक फौंडेशन कोल्हापूचे संस्थापक मा. एस ‌.डी. पाटील सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका सौ पदमश्री पाटील, गुरुकुलचे मुख्याध्यापक दत्तात्रय माने, सूत्रसंचालन व आभार सहा. शिक्षिका स्वाती पुजारी यांनी केले.

Scroll to Top