कोणाचं पारडं जड आवळे की मिणचेकर ?
हातकणंगले/ प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली असली तरी महाविकास आघाडी कडून हातकणंगलेच्या जागेचा तिडा हा कायम आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या सूत्राप्रमाणे विद्यमान आमदार असल्याने आमदार राजू आवळे यांच्यासाठी काँग्रेस आग्रही आहे.
पण दोन वेळा आमदार असलेले, गोकुळ दूध संघाचे विद्यमान संचालक माजी आमदार डॉ सुजित मिणचेकर यांचा मतदारसंघात जनसंपर्क कायम असल्याने या जागेसाठी उद्धव ठाकरे हे आग्रही असल्याची मतदारसंघात जोरदार चर्चा आहे. त्यामुळे ही जागा कोणाच्या वाट्याला येणार याबाबत मतदारसंघात मोठे तर्क वितर्क लावले जात आहेत. या जागेबद्दल गावोगावी जोरदार चर्चा होत आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांच्या हालचालीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.