हातकणंगले विधानसभेची मतमोजणी धान्य गोडाऊनमध्ये

मजमोजणी केंद्रात मोबाईल बंदी : तहसिलदार सुशिल बेल्हेकर

संग्रहित छायाचित्र

हातकणंगले / प्रतिनिधी
निकालाची उत्सुकता लागून राहिलेल्या हातकणंगले विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शनिवार ता. 23 रोजी तहसीलदार कार्यालयाच्या दोन नंबर धान्य गोडाऊनमध्ये होणार आहे . मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होणार असून मतमोजणी प्रतिनिधींना (पुलिंग एजंट ) यांना सकाळी साडेसात वाजता मतमोजणी केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे . मतमोजणी एकूण टेबल तीस टेबलांवर होणार आहे . त्यातील सोळा टेबलांवर मतदान मशीनची (ईव्हीएम मशीन ) मोजणी होणार असून दहा टेबलांवर पोष्टल मतदान व चार टेबलांवर सैनिक मतदारांची मोजणी होणार आहे . मोजणीसाठी १५० अधिकारी व कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे . मतमोजणीच्या एकूण २१ फेऱ्या होणार असून अंदाजे एका मतदान यंत्राच्या मतमोजणीसाठी वीस मिनिटे लागणार आहेत . सर्वसाधारणपणे दुपारी बारा वाजेपर्यंत निवडणुकीचा कल हाती येणार असून दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल . प्रत्येक टेबलावर मोजणीसाठी उमेदवारांचा एक प्रतिनिधीची नेमणूक केली जाणार आहे . मतमोजणी केंद्रात मोबाईल वापरण्यास अथवा फोटोसह, चित्रीकरण करण्यास बंदी आहे . त्याचे उल्लंघन केल्यास मोबाईल जप्त करून संबंधितावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी सांगितले आहे .

Scroll to Top