काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती

संग्रहित छायाचित्र

महाराष्ट्रात आजवरचा सर्वात मोठा पराभव झाला. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढताना काँग्रेसने १०१ जागांवर उमेदवार उभे केले; परंतु काँग्रेसचे केवळ १६ उमेदवार विजयी झाले. या अपयशाची जबाबदारी घेऊन पटोले यांनी राजीनामा दिल्यापासून काँग्रेसकडून नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरू होता. गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत विविध नावांची चाचपणी सुरू होती. त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री नितीन राऊत, सतेज पाटील, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार आदी नेत्यांची नावे चर्चेत होती. खरगे यांची अनुभवी चव्हाण आणि राऊत यांच्या नावाला पसंती होती; पण गांधी यांच्या टीमने महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्षपदी तरुण चेहरा असावा, अशी भूमिका घेतली. सर्वाधिक पसंतीचे नाव सतेज पाटील यांचे होते; पण त्यांनी आणि अमित देशमुख यांनीही नकार दिला.

Scroll to Top