कोल्हापूर / प्रतिनिधी
सुयोग पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सनकिडस् इंग्लिश मीडियम स्कूल केर्ली येथे झालेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेत हर्ष, स्वयंम, श्लोक, तन्मय, वेदराज यांनी अजिंक्यपद पटकाविले.
स्पर्धेचे उद्घाटन संस्थाचालिका सरिता ताटे-पाटील, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळचे माजी सचिव कृष्णात पाटील यांच्या हस्ते पटावर चाल करून झाले. स्पर्धेच्या विविध वयोगटांतील विजेते-उपविजेते स्पर्धक असे : इयत्ता पहिली हर्ष पिष्टे /आयुष चौगले. इयत्ता दुसरी स्वयंम पाटील / आरव कोपार्डे. इयत्ता तिसरी – श्लोक कदम / आरव गुरव. इयत्ता चौथी तन्मय चव्हाण/आदिती कुंभार. इयत्ता पाचवी – वेदराज पाटील अंशुमन पाटील.
स्पर्धेत एकूण ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला. पंच म्हणून कोमल तोडकर, ऐश्वर्या देशमुख, वर्षा माने, कोमल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. बक्षीस वितरण आरिफा बिजली, राष्ट्रीय बुद्धिबळपटू अनुष्का पाटील, संस्थेच्या कार्यकारी संचालिका प्रियांका ताटे-पाटील, सचिन पारळे, मुख्याध्यापिका सुषमा कदम आदींच्या हस्ते झाले.
