कराडाला मस्साजोगच्या भर चौकात फाशी द्या – माजी आमदार मिणचेकर

तहसीलदार कार्यालयासमोर शिवसेनेची निदर्शने

हातकणंगले प्रतिनिधी-

बीड जिल्ह्यातील मासाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्वच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करावी, त्याचबरोबर खंडणी बहाद्दर वाल्मीकी कराडाला सह आरोपी करून मस्साजोग गावच्या भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करत शिवसेना शिंदे गटाच्यावतीने तहसील कार्यासमोर निदर्शने करण्यात आली.


यावेळी बोलताना डॉ. मिणचेकर म्हणाले संतोष देशमुख यांची निर्दयीपणे छळ करत केलेली हत्या आणि मारहाणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यानंतर सर्व स्तरातून प्रचंड चीड आणि संतापाची लाट संपूर्ण राज्यभर निर्माण झाली आहे. या घटनेची दखल घेत शासनाने ही केस फास्टट्रॅकवर चालवून सर्वच आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी व देशमुख कुटुंबियांना न्याय द्यावा. त्याचबरोबर खंडणी बहाद्दर वाल्मीकी कराडाला सह आरोपी करून मस्साजोगच्या भर चौकात फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणी केली. दरम्यान जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख यांनीही तीव्र शब्दात हत्येचा निषेध करत कराडाला फाशी द्या अशी मागणी केली. त्यानंतर हातकणंगले येथील तहसील कार्यालयासमोर कराडाच्या फोटोस जोडो मारो आंदोलन करण्यात आले. त्याचबरोबर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याच्या वक्तव्याचाही यावेळी निषेध करण्यात आला.
यावेळी आंदोलनात जिल्हा उपप्रमुख अविनाश बनगे, महिला जिल्हाप्रमुख वैशाली डोंगरे, तालुकाप्रमुख अजित सुतार, तालुका उपप्रमुख महेश माळी, मागासवर्गीय तालुका अध्यक्ष रमेश कांबळे, युवासेना जिल्हाप्रमुख निशिकांत पाटील, युवासेना जिल्हा उपप्रमुख विनायक यादव, तालुका उपप्रमुख प्रवीण कोळी, माजी सभापती राजेश पाटील, प्रताप देशमुख, सरपंच दीपक पाटील, अरविंद खोत यांच्यासह हातकणंगलेचे शिवसेनेचे नगरसेवक, शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Scroll to Top