इचलकरंजी/ प्रतिनिधी
संत मीराचाई यांच्या स्मरणार्थ आयोजित भजन स्पर्धेला भाविक आणि भजनी मंडळाचा प्रतिसाद लाभला. कृष्णा संवर्धिनी संस्था आणि राष्ट्र सेविका समिती यांच्यातर्फे मंगळवार पेठेतील श्री चौंडेश्वरी मंदिरात भजन स्पर्धा संपन्न झाल्या.
या स्पर्धेत सहभागी प्रत्येक भजनी मंडळाने एक मीरा भजन आणि एक गौळण सादर केली. या स्पर्धेत सागर जोशी संचलित ज्ञानज्योती महिला भजनी मंडळाने प्रथम क्रमांक मिळवला. यामध्ये गायन सौ. रमा सावळजकर, सायली जोशी, प्रतिभा वझे, मनिषा गाडवे, पुजा सातपुते, वैजयंती मुरदंडे, तेजस्वी म्हेत्रे, मनिषा तेलसिंगे, वृंदा तेलसिंगे, प्रेमा तेलसिंगे, नमिता कोळेकर, वृंदा हसबे, दिपाली जाधव यांनी केली. संगीत साथ मंडळाचे प्रशिक्षक सागर जोशी यांनी हार्मोनियम आणि सुधीर कुलकर्णी यांनी तबला साथ केली. या स्पर्धेचे परीक्षण जितेंद्र कुलकर्णी आणि भाग्यश्री कुलकर्णी यांनी केले. यावेळी संपदाताई ओगले, मंजुषा गोखले, विश्वनाथ मुसळे यांच्यासह समितीच्या सेविका उपस्थित होत्या.

