१२ फेब्रुवारीपासून इचलकरंजीत महापालिकेची गुरुवर्य टागोर व्याख्यानमाला

इचलकरंजी/ प्रतिनिधी

मराठी भाषा संवर्धन उपक्रम २०२५ अंतर्गत इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने गुरुवर्य रवींद्रनाथ टागोर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार ता.. १२ ते १५ फेब्रुवारी अखेर चार दिवस सायंकाळी सहा ते आठ या वेळेत श्रीमंत ना. बा. घोरपडे नाट्यगृहात संपन्न होत आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अतिरिक्त आयुक्त श्रीमंती शिंदे यांनी सांगितले की व्याख्यानमालेचे हे सतरावे वर्षे आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महापालिकेच्यावतीने नामवंत व्याख्यात्यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. यामध्ये बुधवार दि.१२ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांचे मी आणि विनोद याविषयी, गुरुवार दि.१३ फेब्रुवारी प्रा. डॉ. विनोद बाबर यांचे यशाचा शिवमंत्र, शुक्रवार दि. १४ फेब्रुवारी रोजी आई कुठे काय करते फेम प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे बाई कुठे काय करते याविषयी तर शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध योगाचार्य संगु गुरुजी यांचे आनंदी जीवन जगण्याची कला या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे.
विविध विषयांवरील व्याख्यानामुळे शहरातील नागरिकांना एक बौद्धिक मेजवानीच मिळणार आहे. सदर व्याख्यानमाला विनामूल्य असून नागरिकांनी याचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त उपायुक्त श्रीमती शिंदे यांनी केले आहे.

Scroll to Top