अण्णासाहेब पाटील, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना अभिवादन

कोल्हापूर / प्रतिनिधी

अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष कै. अण्णासाहेब पाटील यांच्यासह देश स्वातंत्र्यासाठी फासावर जाणारे क्रांतिवीर भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. अखिल भारतीय मराठा महासंघाच्या मंगळवार पेठेतील कार्यालयात राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले.
यावेळी मुळीक म्हणाले, मराठा आरक्षणासाठी पहिले बलिदान देणाऱ्या अण्णासाहेब पाटील यांना मराठा समाज कदापि विसरणार नाही.
यावेळी महिला अध्यक्षा शैलजा भोसले, शिवाजी मोरे, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, उदय देसाई, प्रकाश पाटील, किशोर डवंग, मनोज जाधव, गुरुदास जाधव, संतोष धनवडे, संतोष मंडलिक, संपत्ती पाटील, दीपक मुळीक, अवधूत पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

Scroll to Top