पेठ वडगाव येथील आदर्श गुरुकुलच्या विद्यार्थिनींना सुवर्णपदक

वडगाव / प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र

नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय मिनिगोल्फ क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर विभागाचा द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या स्पर्धेमध्ये आदर्श गुरुकुल विद्यालय पेठवडगांवच्या खेळाडूंना सृष्टी चव्हाण व सिध्देश्वरी पाटील या सुवर्णपदक, तर प्रणाली पाटील कांस्यपदक प्राप्त केले. अनुष्का पाटील, वैष्णवी मोरे, शिवानी पाटील, श्रावणी पाटील, जानवी जाधव, प्राची लांडगे, श्रद्धा कलकुटगी या खेळाडूंनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेसाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.डी.एस. घुगरे, संस्थेच्या सचिवा तथा मुख्याध्यापिका एम.डी. घुगरे, ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आर.बी. शिवई, प्रशासक एस.जी. जाधव, एस.ए.पाटील, जिमखाना प्रमुख एन.ए. कुपेकर, एस.एस. मदने, सहा. शिक्षिका सौ.एस.बी.पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top