प्रतिनिधी / हातकणंगले
अनेक दिवस झाले शासनाकडून मुदांक विक्रेत्यावर अन्याय होत आहे. फक्त ३ टक्के कमिशन मिळते. यात हा व्यवसाय परवडत नाही. या शिवाय शासकीय नियमानुसार नागरिकांना मुद्रांक द्यावे लागतात आणि प्रशासन आम्ही मागतो ते मुद्रांक आम्हाला देत नाही उलट अधिकाऱ्याची आरेरावी ऐकावी लागते. यात शासनाने सुधारणा करावी, अन्यथा नवीन वर्षात शासनाविरोधात अंदोलन करण्याचा इशारा मुदांक विक्रेता संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल बनकर यांनी दिला आहे.
ते पुढे म्हणाले शासनाने प्रत्येक ठिकाणी ५०० चे मुदांक वापरण्याची सक्ती केला आहे पण कोषागर अधिकारी १०० ची स्टॅम्प घेण्याची सक्ती करतात. ते आम्ही घेवून काय करणार पुढे नागरीक घेत नाहीत. आम्ही १०० चे स्टॅम्प घेतले नाही तर अधिकारी आम्हाला ओरडतात मग आम्ही कसा व्यवसाय करणार. यावेळी पंकज बुढे रावसो चौगुले, दिलीप धनवडे प्रकाश पांडव, मधुकर परीट, शबीरमुला यासह हातकणंगलेचे सर्व मुदांक विक्रेते उपस्थित होते.