घोडावत विद्यापीठाचा 1 मार्चला दीक्षांत समारंभ

पद्म श्री जी.डी यादव प्रमुख पाहुणे तर
आचार्य 108 श्री विशुद्ध सागर जी यांना डी.लीट

येथील संजय घोडावत विद्यापीठाचा (Ghodawat University ) सहावा दीक्षांत (convocation ceremony ) समारंभ 1 मार्च रोजी, सकाळी 10 वा. आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पद्म श्री डॉ. जी. डी. यादव नॅशनल सायन्स चेअर (भारत सरकार) व माजी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, मुंबई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी प.पू अध्यात्म योगी आचार्य 108 श्री विशुद्ध सागर जी महाराज यांना मानद विद्यावाचस्पती पदवी (डी.लीट) अध्यक्ष संजय घोडावत यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक,परीक्षा नियंत्रक डॉ. एन. के. पाटील यांनी दिली .
या समारंभात विविध शाखा अंतर्गत अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या एकूण 908 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. त्यामध्ये पदविका 34, पदवी 626, पदव्युत्तर पदवी 239, विद्यावाचस्पती 8 व 1 मानद पदवीचा समावेश आहे. यावेळी कुलगुरू प्रा. डॉ. उद्धव भोसले विद्यापीठाचा वार्षिक अहवाल सादर करतील.

या पदवीदान समारंभासाठी विश्वस्त विनायक भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा व देशाच्या विविध भागातील मान्यवरांना यावेळी आमंत्रित करण्यात आले असून सर्व संबंधित विद्यार्थी व पालकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी केले आहे.

प. पू. अध्यात्म योगी आचार्य 108 श्री विशुद्ध सागरजी महाराज यांनी साहित्य, अध्यात्म आणि समाज बांधणीच्या दृष्टिकोनातून केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल मानद विद्यावाचस्पती पदवी (डी.लीट) दिली जाणार आहे.-अध्यक्ष संजय घोडावत

Scroll to Top