इचलकरंजी / प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्यावतीने २०२४-२५ या वर्षात घेण्यात आलेल्या एनएमएमएस परिक्षेत येथील श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या ७ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस प्राप्त ठरल्या. त्याचबरोबर सारथी शिष्यवृत्ती परिक्षेत प्रशालेच्या १० विद्यार्थिनी शिष्यवृत्ती प्राप्त ठरल्या. ठरल एनएमएमएस शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थिनी – संस्कृती आबाळे, ईशा कांबळे, जान्हवी कुरुंदवाडे, सृष्टी काकणकी, श्रेया लवटे, स्वाती यंकाची, मुफीजा पाथरवट त्याचबरोबर सारथी शिष्यवृत्तीस कोमल चव्हाण, सलोनी पाटील, मानसी पोवार, पूर्वा निर्मल, श्रेयशी जाधव, अर्पिता मोरबाळे, दिप्ती
चव्हाण, मंजिरी माने, नारायणी पाणारी, श्रेया हणमापुरे या पात्र ठरल्या. यशस्वी विद्यार्थिनींना श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हा. चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर महेश बांदवलकर, बाबासो वर्डिंगे, मारुतराव निमणकर, अहमद मुजावर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी व विश्वस्त यांचे मौलिक सहकार्य लाभले. तसेच प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.ए.एस.काजी, उपप्राचार्य व्ही. जी. पंतोजी, उपमुख्याध्यापक व्ही. एन. कांबळे, पर्यवेक्षक एस.व्ही. पाटील, एस.एस. कोळी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले. सी.जी.पी.पाटील व त्यांचे सर्व सहकारी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

