कोल्हापूर /प्रतिनिधी
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हस्तकला विकास आयुक्त कार्यालयाच्या वतीने गांधी हस्तकला बाजार प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. कोल्हापुरातील राजारामपुरी येथील भारत हाऊसिंग सोसायटीच्या
हॉलमध्ये २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत प्रदर्शन सुरू राहणार आहे.
२९ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता खासदार धनंजय महाडिक यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे.