तारदाळ / प्रतिनिधी
हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्या मंदिर शाळेतील मुलींना माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील यांच्या स्वखर्चाने मोफत कराटे प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात आले.
मागील दोन महिन्यांपासून कन्या विद्या मंदिर च्या मुलींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने मुलींनी आपला सहभाग नोंदविला होता. प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वाटप माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे, रणजीत पोवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सुरक्षितता व आत्मरक्षणाच्या दृष्टिकोनातून या प्रशिक्षणाचा उद्देश असून, मुलींमध्ये आत्मविश्वास वाढवणे हाही या उपक्रमाचा महत्त्वाचा हेतू आहे. अमॅच्युअर अकॅडमी फाउंडेशन यांच्या वतीने मुलींना शारीरिक ताकद, तंत्र आणि मानसिक तयारी यांचे प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणामुळे मुलींमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह व जिज्ञासा दिसून आली. यावेळी मुख्याध्यापक विलास कोळी, अभयकुमार चौधरी अशोक भुजवडकर, सुरज कोळी, जीवन माने, पिंटू दाते यांच्यासह कन्या व कुमार विद्यामंदिर चे शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते . सूत्रसंचालन विशाल देसाई व आभार विलास कोळी यांनी मानले.

