सांगली / प्रतिनिधी
मूल न झालेल्या दाम्पत्यांना व स्त्रियांमधील विविध आजारांवर सचिन रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाने उपचार केले जातात. रुग्णालयाच्या वतीने रविवारी (दि. २३ फेब्रुवारी) मोफत वंध्यत्व निवारण व स्त्रीरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ. सचिन सुगाण्णावर यांनी दिली.
हे शिबिर सचिन रुग्णालय,शिवाजी रोड, हॉटेल प्रियदर्शनी मिरज येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४ या वेळेत होणार आहे. यात मोफत तपासणी करून औषधे दिली जातील व आधुनिक उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येईल. मूल न झालेल्या दाम्पत्यांच्या दोषाविषयी व टेस्टट्यूब बेबी तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील अनेक रुग्णांना याचा लाभ झाला आहे.
