कोल्हापूर / प्रतिनिधी
कसबा बावडा येथील न्यायालयाच्या समोरील बाजूस असलेल्या त्र्यंबोलीनगरमधील छोट्या नाल्यातून गुरुवारी आरोग्य विभागाने चार टन प्लास्टिक बॉटल, गाळ व इतर कचरा काढला. भगवा चौकातील करवीर पोलिस ठाण्यासमोर सफाई करण्यात आली.
या नाल्यातील प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या व कचरा साचला होता. त्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत होते. सकाळी महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या व जेसीबीच्या सहाय्याने हा चॅनेल साफ करून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या व गाळ काढण्यात आल्या. यामध्ये चार टन प्लास्टिक बाटल्या, गाळ व इतर कचरा काढण्यात आल्या.
सकाळी या कामाची पाहणी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांनी केली. यावेळी आरोग्य निरीक्षक मुकादम नंदकुमार कांबळे, उपस्थित होते.

