भाकणूककार बाबुराव डोणे यांचे निधन


वाघापूर (ता. भुदरगड) येथील भाकणूककार बाबुराव कृष्णा डोणे (वय ६९) यांचे निधन झाले. श्रीक्षेत्र आदमापूर येथील बाळूमामा व श्रीक्षेत्र हालसिद्धनाथ देवस्थान आप्पाचीवाडी (ता. चिकोडी) या दोन देवस्थानच्या भाकणुकीचे ते मानकरी होते. त्यांच्या अनेक भाकणुकीचे ‘सार’ सत्यात उतरले होते. त्यामुळे त्यांच्या भाकणुकीकडे भाविकांचे विशेष लक्ष असायचे. त्यांनी अनेक ठिकाणी भाकणूक केली होती. भाकणूककार कृष्णात डोणे पुजारी यांचे ते वडील होत. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांचा भक्त परिवार मोठा आहे.

Scroll to Top