कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने कोल्हापूर जिल्हा सब-ज्युनिअर गर्ल्स फुटबॉल संघासाठी निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार, दि. ५ मे रोजी सकाळी ७ वाजता, छत्रपती शाहू स्टेडियमवर ही स्पर्धा होईल. यातून निवडलेला संघ धुळे (शिरपूर) येथील राज्य स्पर्धेत सहभागी होणार आहे.
ज्या मुलींचा जन्म १ जानेवारी २०१२ ते २१ डिसेंबर २०१३ दरम्यानचा आहे, त्यांनी निवड चाचणीस फुटबॉल किट व सत्यप्रत जन्म दाखल्यासह उपस्थित राहाण्याचे आवाहन केएसएतर्फे करण्यात आले आहे.

