इचलकरंजीतील प्राथमिक शाळांमध्ये अग्निशमन यंत्रे बसविणार

इचलकरंजी / प्रतिनिधी

 संग्रहित छायाचित्र

इचलकरंजी महानगरपालिकेकडून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व प्राथमिक शाळांसह महानगरपालिकेच्या सर्व इमारतीत अग्नीशमन यंत्रे बसविण्यात येणार आहेत. आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या सुचनेनुसार ३०० अग्निशमन यंत्रे खरेदी करण्यात आली आहेत. या यंत्रांचे आणि वाहन विभागासाठी घेण्यात आलेल्या महिंद्रा बोलेरो गाडीचे पुजन अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे आणि उपायुक्त प्रसाद काटकर यांच्या हस्ते करणेत आले.
याप्रसंगी मुख्य लेखापरीक्षक आरती खोत, सहा. आयुक्त रोशनी गोडे, विजय राजापुरे, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, प्रकाश मोरबाळे, बाळासाहेब कलागते, राजु बोंद्रे, शेखर शहा, सुभाष मालपाणी, बंडु मुळीक, नितेश पोवार, अरिफा नुलकर, प्रशांत आरगे, स्वप्निल बुचडे, संजय कांबळे, उमेश कांबळे, अनिल कांबळे, अजित खवरे, राजश्री कोरगांवकर उपस्थित होते.

Scroll to Top