इंडो काऊन्ट मिल कामगार आंदोलनावर अखेर तोडगा

हातकणंगले/प्रतिनिधी

आळते (ता हातकणंगले) येथील इंडोकाऊन्ट मिलच्या कामगारांच्या गेल्या पंधरा दिवसा पासून चालु असलेल्या काम बंद आंदोलनावर अखेर तोडगा निघाला. कंपनी व्यवस्थापन व कामगार नेत्यांनी समंजस भुमिका घेऊन कंपनी व कामगारांच्या हिताचे निर्णय घेतल्याने प्रशासनावरील ताण कमी झाला आहे.
विविध मागण्यासाठी इंडो काऊन्ट कंपनीच्या कामगारांनी बेमुदत काम बंद ठेऊन आंदोलन चालु केले होते. कामगारांचे युनियन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या कामगारांची अन्य युनिट मध्ये बदली केल्याने व आंदोलन चिरडण्यासाठी व्यवस्थापनाने वेगवेगळ्या क्लुप्त्या केल्याने वातावरण चिघळत गेले होते. पोलीस प्रशासनाने न्यायालयाचा आदेश दाखवून कामगार आंदोलन करत असलेला तंबू उखडून टाकल्याने संतप्त झालेल्या कामगारांनी तहशिल कार्यालयाच्या आवारात अर्धनग्न आंदोलन चालु केले. यामुळे वातावरण अधिक चिघळले. यावर कंपनी प्रशासन आणि कामगार यांच्यात प्रांत कार्यालयात बैठक झाली. यामध्ये चर्चा होऊन व्यवस्थापनाने हातकणंगले तहसिलदार सुशिलकुमार बेल्हेकर यांच्या उपस्थित लेखी आश्वासन दिले. कामगारांच्या मागण्या मान्य करून एक वर्षाच्या आत टप्याटप्याने अंमलबजावणी करण्याचे मान्य केल्याने तोडगा निघाला. त्यानंतर सर्व कामगार पूर्ववत कामावर हजर झाले.
या आंदोलननात शासकीय अधिकारी पंचायत समितीचे माजी उपसभापती प्रविण जनगोंडा, ग्रा.प. सदस्य जावेद मुजावर, शिरिष थोरात सुरेश आळतेकर, कंपनी प्रशासन कामगार यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी महत्वाची भूमिका बजावली.

Scroll to Top