सोमवारी शरद इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्टार्टअप’ प्रोजेक्टचे प्रदर्शन

यड्राव : प्रतिनिधि

शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये सोमवार, दि. ९ रोजी शरद स्टार्टअप केंद्रांतर्गत स्टार्टअप प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीचे मॅनेजर, एच. आर. यांच्या व उद्योजकांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी संस्थेचे कार्यकारी संचालक अनिल बागणे प्रमुख उपस्थितीत राहणार आहेत. दरवर्षीप्रमाणे या शैक्षणिक वर्षामध्ये इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक व कृषी महाविद्यालयातील प्रथम ते अंतिम वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी हजारपेक्षा अधिक प्रोजेक्ट तयार केले आहेत. त्यामधील स्टार्टअप रेडी प्रोजेक्टस् प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत. प्रदर्शन पाहण्यासाठी महाराष्ट्रातील विविध औद्यागिक क्षेत्रांतील शेकडो उद्योजकांना व तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे.

Scroll to Top