इचलकरंजी / प्रतिनिधी
दक्षिण भारत जैन सभेचे दिगंबर जैन बोर्डिंग येथील श्री १००८ चंद्रप्रभू दिगंबर जैन मंदिराच्या रौप्य महोत्सवानिमित्त पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाच्या विशेषप्रसंगी सामाजिक क्षेत्रात योगदान दिल्या बद्दल माजी खा. कल्लाप्पाण्णा आवाडे यांना ‘संस्काररत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यावेळी अक्षय हजारे यांनी तयार केलेली आवाडे यांच्या जीवनपटावरील डॉक्युमेंटरी सादर केली. जैन समाजाच्या अल्पसंख्याक दर्जाच्या मागणीला यश मिळवून देण्यातही त्यांचे मोलाचे योगदान आहे. या अनुषंगाने आज त्यांचा हृद्य सत्कार आचार्य १०८ श्री जीनसेन मुनी महाराज, आचार्य १०८ श्री चंद्रप्रभू सागर महाराज, परमपूज्य क्षुल्लकरत्न १०५ श्री समर्पण सागर महाराज, श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी नांदणी यांच्या पावन सान्निध्यात आणि प्रतिष्ठाचार्य पंडित डॉ. सम्मेद उपाध्ये यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी माजी आ. प्रकाश आवाडे, किशोरी आवाडे, सपना आवाडे, रवी आवाडे, आदित्य आवाडे, रवींद्र पाटील, सुभाष बलवान आदी उपस्थित होते.

