शिरोली येथील शाहू सहकारी दूध संस्थेची निवडणूक बिनविरोध

शिरोली पुलाची / प्रतिनिधी

येथील शाहू सहकारी दूध संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आ. अमल महाडिक यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ए. ए. चिकणे यांनी काम पाहिले. नूतन सदस्यांचा सत्कार माजी आ. महादेवराव महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सर्वसाधारण गटातून मारुती मिसाळ व महिला गटातून रंजना विठ्ठल पाटील यांनी संस्थेचे हित लक्षात घेऊन माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सतीश पाटील, वडगाव बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, राजाराम कारखान्याचे संचालक दिलीपराव पाटील, माजी उपसरपंच कृष्णात करपे, शिरोली विकासचे संजय पाटील, तर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण, शिवाजीराव पाटील यांनी प्रयत्न केले.
बिनविरोध झालेल्या संचालक मंडळात विद्यमान अध्यक्ष विजय वठारे, दिलीप कौंदाडे, सागर संकपाळ, शामराव पाटील, राजाराम करपे, मधुकर पद्माई, अरुण पाटील, रघुनाथ खोत, बशीर देसाई, सर्जेराव पवार, नितीन चव्हाण, सिद्धू पुजारी यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी चिकणे यांना सचिव रामदास लोळगे, अनिल पाटील यांनी सहकार्य केले.

Scroll to Top