एक होता तो रंगमंच…

संगितसूर्य केशवराव विठ्ठलराव भोसले म्हणजे मराठी नाट्य, गायन, संगित आणि कला क्षेत्रांमध्ये हिमालयाएवढी किर्ती आणि आभाळाएवढं कर्तुत्व असणारा रंगमंचावरचा एक अवलिया. कोल्हापूरच्या सृजनशील मातीत जन्मलेला आणि भारताच्या कलाक्षेत्रात आपला चिरंतन ठसा उमटविणाऱ्या केशवरावांनी कलाक्षेत्राची भरभराट केली.

वयाच्या ४थ्या वर्षी ‘स्वदेश हितचिंतक नाटक मंडळी’ पासून सुरु झालेला त्यांचा प्रवास संगितशारदा, संगित सौभद्र, राक्षस महत्त्वकांशा अशा अजरामर कलाकृतीसोबत अधिकाधिक समृद्ध होत गेला. केशवरावांनी अनेक स्त्री भूमिका ही साकारल्या, त्यांनी साकारलेली संगीत सौभद्र नाटकातील मृणालिनी ची भूमिका अजरामर झाली. संगीत मानापमान या नाटकातील धैऱ्याधराची भूमिका त्यांनी अत्यंत तडफदार पणे साकारली. मराठी रंगभूमीवर संगीत, गायन, दिग्दर्शन या क्षेत्र मध्ये अत्यंत कमी वयात एक अतुलनीय कामगिरी त्यांनी केलं. अवघ्या ३१ वर्षाच्या आयुष्य मध्ये त्यांनी रंगभूमीला नवचेताना दिली.
आज त्यांची जयंती, केशवरावांच्या आठवणींना उजाळा देण्याचा दिवस, पण आज त्यांच्या आठवणी गेली ११० वर्ष आपल्या मध्ये जपणारे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह काल आगीच्या विळख्यात जाळून खाक झाले, आणि सगळी नाट्यसृष्टीत हळहळली.

नटसम्राट, बालगंधर्व, मिरची मावशी अश्या अनेक अजरामर कलाकृतींची साक्ष असणारा आणि अनेक कलाकारांना कलाक्षेत्रामध्ये यशस्वी करणारा रंगमंच काल काळाच्या पडद्याआड गेला. कोल्हापूर जिल्ह्यातील कलाक्षेत्रातील पंढरीला झालेले हे नुकसान कधीही भरून निघणार नाही.

शब्दांकन

प्रणव विठ्ठल बिरंजे

Scroll to Top