कोल्हापूर स्त्रीरोग, प्रसूती संघटना अध्यक्षपदी डॉ. नागावकर; सचिवपदी डॉ. किल्लेदार

कोल्हापूर / प्रतिनिधी

कोल्हापूर स्त्रीरोग व प्रसूती संघटनेच्या २०२५ ते २०२७वर्षासाठी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी डॉ. एम. जे. नागावकर तर सचिवपदी डॉ. रणजित किल्लेदार, उपाध्यक्षपदी डॉ. प्रशांत शहा यांची निवड करण्यात आली.
अन्य कार्यकारिणीत खजानीस डॉ. दादासाहेब पाटील, सहसचिव डॉ. गौरी साईप्रसाद, डॉ. इंद्रनील जाधव, वैद्यकीय सचिव डॉ. किशोर केसरकर, सह खजानीस डॉ. रूपा नागावकर, सह वैद्यकीय सचिव डॉ. अस्मिता भागवत, डॉ. गौरी केणी यांची निवड झाली.

Scroll to Top