जयसिंगपूर / प्रतिनिधी
येथील डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन विभागामधील दहा विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली आहे, अशी माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्रा. सौरभ खानावळे यांनी दिली.
कॉम्प्युटर विभागाच्या रितेश पाटील व अनुराग कुरणे यांची अॅक्टि इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये वार्षिक ३,६५ लाख रु. पॅकेज वरती निवड झाली आहे. तसेच इलेक्ट्रॉनिक टेली कम्युनिकेशन विभागाच्या ओंकार तिबिले, स्वरूप जाधव, कौशल्य जाधव, प्रणव पाटील, शुभम दबडे, गुरुराज चव्हाण, सुमित हजारे व शुभम कासालकर या आठ विद्यार्थ्यांची सॅन्की बिझनेस सोल्युशन प्रा. लिमिटेड या कंपनीमध्ये रु. चार ते सहा लक्ष पॅकेज वरती निवड झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये काम करणाऱ्या कंपन्यांच्या बरोबर आमच्या महाविद्यालयाचे सामंजस्य करार असल्यामुळे हे शक्य होते, असे मत प्रा. डॉ. गोपाळ मुलगुंड यांनी व्यक्त केले. ट्रस्टचे चेअरमन डॉ. विजय मगदूम, व्हॉ. चेअरपर्सन डॉ. सोनाली मगदूम व कॅम्पस डायरेक्टर डॉ. सुनील आडमुठे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर, विभाग प्रमुख व टेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

