कोल्हापूर / प्रतिनिधी
डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये सुसज्ज १०० बेडच्या ‘चाईल्ड फ्रेंडली’ बालरोग विभागाचे उद्घाटन विश्वस्त वैजयंती संजय पाटील व अॅडव्हायझर वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी कुलपती डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा आदी उपस्थित होते.
६० बेडचा जनरल शिशू विभाग, ३० बेडचा नवजात शिशू विभाग आणि १० बेडचा अतिदक्षता विभाग उपलब्ध असून थैलेसिमिया बालकांसाठी डे केअर सुविधा आहे.
उद्घाटनप्रसंगी उपअधिष्ठाता डॉ. राजेश ख्यालाप्पा, बालरोग विभागप्रमुख डॉ. निवेदिता पाटील डॉ. मोहन पाटील, डॉ. सुहास कुलकर्णी, डॉ. रमेश निगडे, डॉ. साईप्रसाद कवळेकर, डॉ. देवयानी कुलकर्णी, डॉ. प्रीती नाईक, डॉ. श्रद्धा कुलकर्णी, डॉ. अर्चना पवार, डॉ. रवींद्र पवार, डॉ. विलास जाधव, उपकुलसचिव संजय जाधव, सहायक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, प्रा. सदानंद सबनीस, केतन जावडेकर आदी उपस्थित होते.
