कोल्हापूर / प्रतिनिधी
नागाव (ता. हातकणंगले) येथे आज (शनिवार) आणि उद्या (रविवारी) दोन दिवसीय भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने सनी स्पोर्टस् मंडळाच्या वतीने ३५ व ६० किलो वजनी गटात ही स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा नागाव येथील कन्या शाळेच्या पटांगणात होणार असून ३५ किलो गटाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये ११०००, द्वितीय क्रमांक रुपये ७०००, तृतीय क्रमांक रुपये ५०००, तर ६० किलो गटाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस रुपये २१०००, द्वितीय क्रमांकाचे रुपये १५००० व तृतीय क्रमांकाचे रुपये ११००० असे असून सर्व संघ हे निमंत्रित आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांनी अधिक माहितीसाठी माणिक सावंत, संतोष घाटगे, सतीश ऐतवडे, अमोल हराळे यांच्याशी संपर्क साधावा.

