शेतकरी संघातील ऑईल विक्रीचा खुलासा करण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा आदेश

कोल्हापूर / प्रतिनिधी

शेतकरी संघातील ४० लाखाचे ऑईल निम्म्या किंमतीत म्हणजे २० लाख रुपयास विक्री करणे, मुंबईतील फ्लॅट भाड्याने देणे या प्रकरणाचा खुलासा करावा, असा आदेश जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी दिला आहे. शेतकरी संघाच्या विविध पेट्रोल पंपांवर ४० ते ४२ लाख रुपये किंमतींचे आईल होते. चार ते पाच महिन्यापूर्वी संघाच्या अध्यक्षांनी कोणताही ठराव न करता ते परस्पर २० लाख रुपयास विक्री केले. संघाची कोणतीही मालमत्ता विक्री करताना त्यासाठी निविदा काढणे आवश्यक असते. परंतु अशी कोणतीही प्रक्रिया न करता. ऑईल थेट विक्री केले आहे, अशी तक्रार विजय आस्वले व सुनिल पाटील यांनी केली होती.

Scroll to Top