जिल्हा बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी व्ही. आर. पाटील

कोल्हापूर/प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या वार्षिक निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलचे विजय उर्फ व्ही. आर. पाटील अध्यक्ष म्हणून विजय झाले, तर उपाध्यक्षपदी तुकाराम शंकर पाडेकर हे विजयी झाले. व्ही. आर. पाटील पॅनेलने ९ जागांवर तर अॅड. आनंदराव जाधव पॅनेलने ६ जागांवर यश मिळवले. शनिवारी रात्री निकाल जाहीर झाल्यानंतर न्यायसंकुलाच्या आवारात फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.
सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाल्यानंतर सायंकाळी ६ वाजता मतमोजणी सुरू झाली. निवडणूक निर्णय अधिकारी अॅड. सुभाष पिसाळ व त्यांच्या टीमने मतमोजणीचे चोख नियोजन केले होते. निवडणूक चुरशीने झाल्यामुळे निकालाचा कौल कोणाच्या पारड्यात पडणार, याची उत्सुकता प्रत्येकाला अस्वस्थ करत होती. रात्री १० वाजता निकाल जाहीर झाला, तेव्हा विजयी उमेदवारांनी एकच जल्लोष केला.
विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते अध्यक्ष व्ही. आर. पाटील (९७६), उपाध्यक्ष तुकाराम पाडेकर (११३५), लोकल ऑडिटर प्रमोद दाभाडे (१०४४), महिला प्रतिनिधी मनीषा सातपुते (९३४),कार्यकारिणी सदस्य वैभव पाटील (१०८२), सम्राज्ञी शेळके (१००९), प्रीतम पातले (९१७), वैष्णवी कुलकर्णी (९५८), मीना पाटोळे (९८५), अॅड. आनंदराव जाधव पॅनेलचे विजयी उमेदवार सचिव पदाचे उमेदवार मनोज पाटील ९१३, सहसचिव सुरज भोसले-८८४, कार्यकारणी सदस्य स्वप्नील कराळे ७२४, स्नेहल गुरव, ९०३, हंसिका जाधव ९००, आणि निखिल मुदगल ८२० हे विजयी झाले.

Scroll to Top