
रांगोळी येथील रयत शिक्षण संस्था संचलित सौ. इंदुमती शंकरराव गाट इंग्लिश स्कूल या शाळेचा आज वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुण दर्शनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले रांगोळी गावच्या लोकनियुक्त सरपंच संगीता नरदे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भेट व शुभेच्छा स्वरूपात मिळालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना केले.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य बाबूराव सादळे, शिवसेना शहरप्रमुख रजनीकांत माने, रमेश पाटील, ग्रा.पं. सदस्य अर्चना मगदुम, अनिल शिरोळे, पांडुरंग सौंदलगे , शाळेचे मुख्याध्यापक कलाजे सर, संतोष कमते, रणजित देवणे यांच्यासह स्कूल कमिटीचे सदस्य, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
