पुरुष हॉकीसाठी दिग्विजय नाईक स्पर्धा प्रमुख

इचलकरंजी / प्रतिनिधी

झांसी (उत्तर प्रदेश) येथे होणाऱ्या १५व्या वरिष्ठ गट पुरुष हॉकी स्पर्धेसाठी स्पर्धा प्रमुख म्हणून दिग्विजय नाईक यांची हॉकी इंडियाकडून निवड झाली आहे.
दिग्विजय नाईक हे हॉकी स्पर्धेत टेक्निकल डेलीगेट म्हणून काम पाहतील. सदर स्पर्धा तीन गटात होणार आहेत. या वर्षी क गटातील पहिल्या २ संघाची, ब गटात बढती होईल. ब गटातील टॉप दोन संघाना अ गटात बढती मिळेल. ब गटातील शेवटच्या दोन संघाची, क गटात उतरणी होणार असून, अ गटातील शेवटच्या दोन संघाची ब गटात उतरणी होणार. दिग्विजय नाईक यांनी अनेक राष्ट्रीय स्पर्धा , खेलो इंडिया, पुलिस गेम्समध्ये स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहिले आहे. दिग्विजय नाईक हे हॉकी इंडियातर्फे अनेक पंच शिबिरात प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. नाईक यांना मुंबई पोर्ट प्राधिकरणचे अध्यक्ष सुशील कुमार सिंग, उपाध्यक्ष आदेश तितरमारे, सचिव पवण बाहेकर, पद्मश्री धनराज पिल्ले, हॉकी महाराष्ट्रचे प्रमुख आयपीएस कृष्णप्रकाश, मनीष आनंद, मनोज भोरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Scroll to Top