कोल्हापूर / प्रतिनिधी
साडेतीन मुहूतपैिकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी रविवारी सकाळपासून पर्यटक व भाविकांची मोठी रांग लागली. दिवसभरात ८७ हजार १०७भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. दरम्यान, देवस्थान समितीच्या वतीने प्रथेनुसार पारंपरिक पद्धतीने मंदिर प्रांगणात गुढी उभारून पूजन करण्यात आले. हिंदू संस्कृतीतील हिंदून नववर्षारंभ व गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत अनेकांनी कोल्हापूरच्या पर्यटनाला पसंती दिल्याने रविवारी सकाळपासून अंबाबाईच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली. पर्यटक मोठ्या संख्येने अंबाबाईच्या दर्शनासाठी दिवसभर गर्दी करत होते. तसेच नववर्षाचे स्वागत करत स्थानिक भाविकांनीही अंबाबाईचे दर्शन घेतले.

