नृसिंहवाडी / प्रतिनिधी
उन्हाळ्याच्या सुट्टीला सुरुवात होताच श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे दत्त दर्शनासाठी गर्दी वाढली आहे. त्यामुळे नृसिंहवाडीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असून बाजारपेठ, दुकाने, हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नुकतेच बसस्थानकाचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.
गेटच्या प्रवेशद्वारावर हे काम अर्धवट सोडण्यात आले आहे.ग्रामपंचायतीने यात्रेकरूंसाठी दत्त मंदिर रस्ता केला आहे. मंदिराच्या उत्तरेपासून कमी पायऱ्यांचा नवीन घाट केला आहे. दत्त देवस्थानकडून नव्याने १५ कोटी रुपये खर्च करून नवीन भक्त निवास उभारण्यात येत आहे. सुविधांच्या तजविजीमुळे मंदिरासह परिसराचा विकास होत जाणार आहे.

