कोल्हापूर / प्रतिनिधी
शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात गुरुवारी (दि. २०) होणारी राज्यव्यापी बैठक यशस्वी करण्याचा निर्धार माणगाव (ता. हातकणंगले) येथे झालेल्या जनजागृती मेळाव्यात न करण्यात आला. राजगोंडा बेले यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला.
समन्वयक गिरीश फोंडे म्हणाले, राज्यातील दहा जिल्ह्यांतून शक्तिपीठ महामार्गाला विरोध आहे. एकाही आमदारासोबत बैठक झाली नसताना सरकार मात्र बैठक झाल्याचे सांगत शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेण्याचे काम सरकार करत आहे.
के. डी. पाटील म्हणाले, शासनाने शेतकऱ्यांची दिशाभूल करू – नये. माणगावातून बहुसंख्येने मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राजगोडा बेले यांनी केले.
मेळाव्यास शिवगोंडा पाटील, शामराव कांबळे, सुनील बन्ने, आयुब नदाफ, राजू मुगुडखोळ, युवराज शेटे, महावीर खोत, शिवानंद कार्वेकर, सौरभ मगदूम, निवास महाजन, रघुनाथ जोग यांच्यासह स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने न उपस्थित होते. युवराज शेटे यांनी स्वागत केले. अभिषेक मगदूम यांनी आभार मानले.
