जयसिंगपुरात रूळ बदलण्यात बिघाड; रेल्वे फाटक बंद, वाहनधारकांचे हाल

जयसिंगपूर / प्रतिनिधी

येथील रेल्वे स्थानकात रूळ बदलण्याच्या सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.
या बिघाडामुळे जयसिंगपूरहून कोथळी, उमळवाड, दानोळी, बायपास मार्गेकडे जाणारी सर्व वाहने रेल्वे फाटकात तब्बल दीड तास अडकून राहिली होती. यामुळे वाहनधारकांना उदगावमार्गे बायपास महामार्गाला जाण्यासाठी तब्बल ५ कि.मी.च्या फेऱ्याने सायंकाळी ६ वाजेपर्यंत वाहतूक सुरू होती.
जयसिंगपूर रेल्वे स्थानकात २ रेल्वे ट्रॅक आहेत. शिवाय रेल्वे स्टेशनलगतच जयसिंगपूरहून उदगाव बायपास, उमळवाड, कोथळी, दानोळी, कवठेसार, जैनापूर जाणाऱ्या रस्त्यावर रेल्वे फाटक आहे. सायंकाळी ४.३० च्या सुमारास रूळ बदलण्याच्या सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली.

Scroll to Top