नृसिंहवाडी/प्रतिनिधी

संग्रहित छायाचित्र
नृसिंहवाडी (ता. शिरोळ) येथे आज बुधवार दि. १२ फेब्रुवारीपासून श्री दत्त गोपाळकाला उत्सवास प्रारंभ झाला आहे. ७ दिवस चालणाऱ्या या उत्सवात नित्य कार्यक्रमाबरोबर श्री दत्त चरणांवर पंचामृत पुजा, सायंकाळी महापुजा, मध्यरात्री पालखी सोहळा तसेच गायन, व्हायोलीन, हार्मोनियम असे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. मंगळवार १८ रोजी सायं. ७ वा. धुपारती, रात्री पालखी व शेजारती असे कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता होणार आहे.
