दशभुजा गणेश दर्शनाचा योग उद्यापासून

कोल्हापूर / प्रतिनिधी

यंदा पुष्टीपती विनायक जयंती सोमवार, दि. १२ मे रोजी असून यानिमित्ताने दशभुजा गणेश (दहा हातांचा गणपती) दर्शन घेणे व पुष्टीपती स्तोत्र वाचनाला विशेष महत्व आहे. त्यानुसार शाहूपुरी सातवी गल्ली येथील पंचमुखी गणेश मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले राहाणार आहे. रविवारी (दि. ११) रात्री ८ वाजून १ मिनिटापासून ते सोमवारी (दि. १२) रात्री १० वाजून २५ मिनिटांपर्यंत दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिराचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

Scroll to Top